maval Corona Update : मावळ तालुक्यातील रुग्ण संख्येत घट; रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.11) 47  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 38  जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन, आतापर्यंत 450  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 667  आहे.

शहरी भागात 11 तर ग्रामीण भागात 36  रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 11 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या22,729  झाली आहे. तर दिवसभरात 38  रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 6, ब्राम्हणवाडी (साते) व माळवाडी प्रत्येकी 3, कुसवली, सोमाटणे, नायगाव, साते, कामशेत व आर्डव प्रत्येकी 2,
देवघर, वेल्होवेळी,नाणे, घोणशेत, करूंज, भोयरे, शिरगाव, सांगावडे, आंबळे प्रत्येकी 1
असे  एकूण 36  रुग्ण सापडले.

21,612  जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 450  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 7,296 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3888 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1164  रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 12,352 रुग्ण तर ग्रामीण भागात 10,377 रुग्ण आढळून आले आहेत. 4 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.09  टक्के आहे तर मृत्यू दर 1.18  टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये 165  लोणावळा नगरपरिषदमध्ये 50  वडगाव नगरपंचायतमध्ये 26 व ग्रामीण भागात 426  असे एकूण 667  रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.