रविवार, सप्टेंबर 25, 2022

Maval : डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रेणुका वाडेकर यांची निवड

एमपीसी न्यूज : पवन मावळातील (Maval) डोणे येथील एकता प्रतिष्ठाण आयोजित डोणुआई देवी नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रेणुका वाडेकर यांची निवड करण्यात आली.

तसेच समितीच्या उपाध्यक्षपदी राणी खिलारी, कार्याध्यक्षपदी सुषमा आरूठे, खजिनदारपदी उषा घारे तर सचिवपदी वैशाली चांदेकर, सदस्या सोनाली काळभोर, आकांक्षा कारके, शितल घारे, सुप्रिया कारके, सोनाली लांडगे या सर्वांची निवड एकता प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब घारे, अध्यक्ष योगेश कारके, उपाध्यक्ष रविंद्र काळभोर, कार्याध्यक्ष विशाल कारके, सचिव मल्हारी खिलारी, खजिनदार विश्वास चांदेकर, पोलिस पाटील उमेश घारे तसेच सदस्य सोमनाथ खिलारी, वैभव कारके, संदेश चांदेकर, रणजित खिलारी या सर्वांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव समितीची निवड करण्यात आली.

Vadgaon Maval : शेतीसह शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती करा

एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून डोणे व परिसरात (Maval) अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. मात्र, या वर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘सन्मान स्त्रीचा’ या उपक्रमासह इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

spot_img
Latest news
Related news