_MPC_DIR_MPU_III

Maval: आमदार शेळके यांनी पोचवल्या दुर्गम भागातील आदिवासी वाड्या-वस्त्यांपर्यंत जीवनावश्यक वस्तू

एमपीसी न्यूज – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील दुर्गम भागात तसेच आदिवासी वाड्या-वस्त्यांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचवून आमदार सुनील शेळके यांनी जनतेला दिलेल्या शब्दाचे पुरेपूर पालन करीत एक आदर्श घालून दिला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या संकटकाळात कोणतेही कुटुंब उपाशी राहू नये म्हणून आमदार सुनील शेळके यांनी ‘मदत नव्हॆ कर्तव्य’ या उपक्रमांतर्गत गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे संच घरपोच देण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. शक्य तितक्या जास्तीत जास्त गरजू कुटुंबांपर्यंत हे साहित्य पोहचविण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शहर आणि परिसरात गरजूंना विविध माध्यमांतून मदत मिळत असताना डोंगराळ, दुर्गम भागात राहणारी आदिवासी कुटुंबे मदतीच्या प्रतीक्षेत होती. त्यांची ही समस्या ओळखून आज आंदर मावळातील गोवित्री आणि परिसरातील गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

आमदार शेळके यांनी दुर्गम भागातील आपल्या बांधवांची आठवण ठेवून नीतांत गरज असताना जीवनावश्यक वस्तू आमच्यापर्यंत पोहचवून खरे बंधूप्रेम दाखवून दिले, अशा भावना यावेळी आदिवासी भगिनींनी व्यक्त केल्या. सुनील आण्णांनी कर्तव्य भावनेतून केलेली ही आम्ही कधीही विसरणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्थाच अडचणीत आली आहे. त्याची सर्वात मोठी झळ गोरगरीबांना बसत आहे. त्याची जाणीव ठेवून आमदार शेळके यांनी दुर्गम भागातील आदिवासी बांधवांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहे. संपूर्ण मावळ हा सुनीलआण्णांचा परिवार असून त्याच भावनेतून ते सर्वांची काळजी घेत आहेत व घेत राहतील, अशी ग्वाही आमदार शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी दिली.

यावेळी मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गणपत शेडगे, ग्रामपंचायत सदस्य अरुण आढाव, सुदाम कदम, अमोल पवार, प्रवीण शेडगे, चेअरमन नारायण आढाव, बाळू शिंदे, नारायण मालपोटे, सुरेश आढाव, राहुल मोहिते, अतुल आढाव श्रीपत गायकवाड, रमेश भुरुक, बाजीराव शिंदे, दत्ता जाधव, रोहिदास सोनवणे, यशवंत सोनवणे, नवनाथ पवार, नीलेश जाधव, सुनील आढाव, दत्ता लोखंडे, विनायक जाधव, दीपक सुतार, गणेश ठाकर, विनायक जाधव, सागर सावंत, शाम शिंदे, राजू गरुड, नवनाथ केदारी, रामदास केदारी, योगेश केदारी, पंकज आढाव, मयूर नाटक आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.