Maval News : छोट्या व्यवसायिकांची उपासमार टाळण्यासाठी लॉकडाउनच्या नियमात बदल करा : आझाद समाज पार्टी

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणारे छोटे व्यावसायिक आणि व्यापारी तसेच त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची उपासमार टाळण्यासाठी लॉकडाउनच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी आझाद समाज पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात आझाद समाज पार्टीचे मावळ तालुकाध्यक्ष प्रकाश म्हासे यांनी मावळच्या तहसीलदारांना निवेदन दिले आहे. अमित इंगळे यावेळी उपस्थित होते.

सध्या लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणारे छोटे व्यावसायिक आणि व्यापारी तसेच त्यांच्यावर अवलंबून असणारे कामगार यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अशीच परिस्थिती या पुढे राहिल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यातून मानसिक त्रास वाढून आत्महत्या किंवा उपासमार होऊन मृत्यू होण्याची शक्यता आहे.

हे होऊ नये यासाठी लॉकडाउनच्या निर्णयात बदल करून छोट्या व्यावसायिकांना काही तास दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी; अन्यथा भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.