Maval News : वनरक्षक रेखा वाघमारे यांना ‘उत्कृष्ठ वनरक्षक पुरस्काराने’ गौरव

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ वनपरिक्षेत्राच्या बेबडओहळ येथे कार्यरत असलेल्या रेखा वाघमारे यांना ‘उत्कृष्ठ वनरक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. एक ते सात ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे.

या सप्ताहात वाघमारे यांना वन विभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. वन व वन्यजीव संरक्षण, संवर्धन उत्तमरित्या केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

वनातील वणवा विझवणे, अवैध शिकार, वृक्षतोड, उत्खनन, वनात अप प्रवेश, जखमी वन्यजीवांना त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, बिबट्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे यासंबंधित वनरक्षक रेखा वाघमारे यांनी कार्य केले आहे.

वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव, वनपाल ज्ञानदेव ढेंबरे, सागर चुटके, यादव जाधव, वनरक्षक मंगल दाते, भरती भुजबळ, वीरेंद्र लंकेश्वर, वनिता राठोड, सिरसे, गजेंद्र भोसले, आशा शेळके, मोहिनी सिरसाट, साईनाथ खटके, सोनाली शेळके आदींनी रेखा वाघमारे यांचे पुरस्काराबद्दल कौतुक केले.

वनरक्षक रेखा वाघमारे म्हणाल्या, “वन विभागात वन व वन्यजीव यांचे संरक्षण, संवर्धन करताना आनंद वाटतो. वन व वन्यजीवांच्या अस्तित्वावर मानवी अस्तित्व अवलंबून आहे. या पुरस्कारामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली असून जबाबदारी वाढली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.