-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maval News : अतिवृष्टीच्या तडाख्याने डोंगरगावमधील 18 कुटुंबांचे नुकसान

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात गुरुवारी (दि. 22) पहाटेपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे डोंगरगाव येथील 18 कुटुंबांचे नुकसान झाले. त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्थलांतर केले.

मळवली येथील 6 कुटुंबांना अतिवृष्टीचा फटका बसल्याने त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतर केले. वरील कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना स्थलांतर करण्यात आल्याची माहिती मावळचे निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

या अतिवृष्टीमुळे अद्यापही जीवित हानी झाली नाही. महसूल प्रशासन व एन डी आर एफ पथक तैनात झाले. या अतिवृष्टीमुळे निकमवाडी, तुंग किल्ला, आर्डव व थुगाव येथे प्रत्येकी एक घराचे नुकसान झाले आहे.

कार्ला ते एकविरा मंदिर, धामणे पुलावर पाणी, आपटी गेव्हंडे रस्त्यावर माती वाहून आल्याने रस्ता बंद, कामशेत ते नाणे रस्त्या पाण्याखाली, चांदखेड ते आढले खुर्द पुलावरून पाणी, खामशेत ते खांडशी पुलावर पाणी, वडीवळे पुलावर पाणी, देवले-मळवली रस्त्यावर पाणी आदी ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर आले आहे.

मावळात जोरदार पाऊस चालू असल्याने आज गुरुवारी (दि. 22) मावळातील नऊ गावांच्या मुख्य दळणवळणाचा असलेला वाडिवळे -बुधवडी पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे नऊ गावांचा संपर्क तुटला असल्याची माहिती बुधवडीचे शिवसेना उपशाखाप्रमुख योगेश टाकळकर यांनी दिली.

मावळात संततधार सुरु असल्याने नदी, ओढे व धरण किनारी असलेल्या नागरिकांनी सतर्क राहून परिस्थितीची माहिती महसूल प्रशासनाला द्यावी. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन सुदुंबरे येथील एन डी आर एफ पथक व शिवदुर्ग लोणावळा आदींना तैनात ठेवले आहे.

निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांच्या मोबाईल नंबर ८९७५५९९५०० संपर्क साधा.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.