Maval News : आंबी, वारंगवाडी, गोळेवाडी येथे विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन फंडमधून आंबी, वारंगवाडी, गोळेवाडी या तीन गावांमध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामध्ये अंगणवाडी इमारत, रस्ते कॉंक्रिटिकरण, शाळा दुरुस्ती, नवीन वर्गखोली, पाणीपुरवठा योजना, दलीतवस्ती समाजमंदिर, ॲम्प्लिफायर संच आदी कामांचा समावेश आहे. या विकासकामांचा उद्घाटन व भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सभापती बाबुराव वायकर यांचा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला, सभापती बाबुराव आप्पा वायकर यांच्या जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन फंडातून आंबी, वारंगवाडी, गोळेवाडी या गावांमध्ये निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामध्ये अंगणवाडी इमारत,रस्ते कॉंक्रिटिकरण, शाळा दुरुस्ती, नवीन वर्गखोली, पाणीपुरवठा योजना, दलीतवस्ती समाजमंदिर,ॲम्प्लिफायर संच इत्यादी विकासकामांसाठी निधी मंजूर केलेला आहे. काही काम पूर्णत्वास गेलेली आहे व काही कामे प्रगतीपथावर आहेत.

यावेळी सरपंच-संगीता भरत घोजगे,ग्रा.पं. सदस्य-विक्रम कलवडे,मंगल घोजगे, सुरेखा घोजगे, सारिका धुमाळ, निलेश घोजगे, बाळा बनसोडे, प्रा.भगवान शिंदे, पिराजी वारींगे, पांडुरंग महाराज वारींगे, तुकाराम वारींगे, संजय वारींगे, दत्तात्रय कलवडे, रामनाथ घोजगे, दत्तात्रय घोजगे, सोमनाथ पवार, माजी सरपंच-विठ्ठल मोहिते, माजी उपसरपंच-अनिल मोहिते, सुनील दंडेल, गणेश ढोरे, भाऊ ढोरे, सुहास वायकर, सुजित माझीरे, ॲड. अक्षय रौंधळ, संजय दाभाडे, विष्णू गोळे, समीर जाधव, भानुदास दरेकर, राहुल बनसोडे, देविदास पोटवडे, विठ्ठल मोरे, किरण घोजगे, आत्माराम शिंदे, चंद्रकांत शिंदे व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

यानिमित्ताने सभापती बाबुराव वायकर यांची वारंगवाडी ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच पुणे जिल्हा परिषदेमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बैलजोडी ही नाविन्यपूर्ण योजना संपूर्ण जिल्ह्यात राबवत आहेत ती शेतकऱ्यांच्या हिताची आहे. या योजनेच्या माध्यमातून शेती कामासाठी भरपूर असा उपयोग झालेला आहे त्या अनुषंगाने एक सद्भावना म्हणून आपली ही मिरवणूक बैलगाडीतून काढण्यात येत आहे अशा भावना उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ यांनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.