Maval News : आमदार सुनील शेळके यांची नाळ जनतेशी जोडलेली आहे – मंत्री प्राजक्त तनपुरे

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांची कामगिरी मावळ मतदारसंघात उत्कृष्ठ आहे. शेळके मावळच्या सर्वसामान्य जनतेला वेळ देणारे आमदार आहेत. त्यांची नाळ जनतेशी जोडलेली आहे, असे कौतुकोद्गार नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काढले.

येथील शासकीय विश्रामगृहात भेट देण्यासाठी आले असता, सोमवारी (दि.30) ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांचा आमदार सुनील शेळके यांनी भव्य सत्कार केला.

याप्रसंगी अंकुश आंबेकर,संजय बाविस्कर, नारायण मालपोटे, सोमनाथ आंद्रे आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री तनपुरे पुढे बोलताना म्हणाले मावळ तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी उत्कृष्ट व्यवस्था असुन आमदार निलेश लंके सारखेच काम आमदार सुनील शेळके यांचे आहे. मावळ तालुक्याला विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार सुनील शेळके यांच्या जनता दरबाराबाबतही तनपुरे यांनी कौतुक व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.