Maval News: घरात घुसून महिलेवर वार करत मंगळसूत्र पळवले

एमपीसी न्यूज – मध्यरात्री चार चोरटे एका महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसले. महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले. दरम्यान चोरट्यांना प्रतिकार करत असताना चोरट्यांनी महिलेच्या हातावर शस्त्राने वार करून तिला जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १२) मध्यरात्री मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.

याप्रकरणी ५५ वर्षीय महिलेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन ते चार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास तीन ते चार अज्ञात चोरटे फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा ढकलून जबरदस्तीने घरात आले. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले.

दरम्यान फिर्यादी महिलेने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये झटापट झाली. त्यात चोरट्यांनी त्यांच्याकडे असलेल्या हत्याराने महिलेच्या हातावर वार करून तिला जखमी केले. त्यांनतर चोरटे पळून गेले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.