Chinchwad Crime News : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी पाच दुचाकी, एक रिक्षा अशी सहा वाहने चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 12) तळेगाव एमआयडीसी, निगडी, दिघी, पिंपरी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच चिंचवड येथे घरातून साहित्य आणि सुसगावातील मंदिरातून साहित्य चोरीला गेले आहे.

आंबी गावच्या हद्दीत एका पान टपरीच्या मागील बाजूला पार्क केली 25 हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजता उकडकीस आली. याप्रकरणी नितीन रामचंद्र नखाते (वय 36, रा. वारंगवाडी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्राधिकरण निगडी येथील नियोजित महापौर बंगला मैदानासमोरून 6 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते सव्वासहा वाजताच्या कालावधीत 10 हजारांची मोपेड दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुमित सुनील शिंदे (वय 23, रा. च-होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते राहत असलेल्या हॉस्टेलच्या पार्किंग मधून चोरट्यांनी त्यांची 35 हजार रुपयांची दुचाकी चोरून नेली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

संपत हरिभाऊ नानेकर यांची 15 हजारांची दुचाकी तर अमानुल्ला अब्दुल वकील अन्सारी यांची 30 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. या दोन्ही प्रकरणात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बालाजी देवला जाधव (वय 43, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची एक लाख रुपये किमतीची तीन चाकी रिक्षा त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली.

सुस गावातील शिव मंदिरात चोरी

सुसगाव येथील शिव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. मंदिरातून 27 हजार 200 रुपये किमतीचा ऍम्प्लिफायर, 2250 रुपयांचा माईक असा एकूण 29 हजार 450 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 7 डिसेंबर रोजी दुपारी दोन ते 8 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा या कालावधीत घडली. याप्रकरणी इस्माईल इब्राहिम मत्तुर (वय 30, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.