Maval News : सांगुर्डीच्या सरपंचपदी वसंत भसे, उपसरपंचपदी सोनम भसे

एमपीसीन्यूज : सांगुर्डी ग्रा. पं. सरपंच व उपसरपंचपदासाठी गुप्त मतदान होऊन निवडणूक झाली. त्यात वसंत भसे यांची सरपंच, तर नयना भसे यांची उपसरपंचपदी निवड घोषित करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

सरपंचपदासाठी  वसंत सुदाम भसे यांना 4, तर नयना स्वप्नील भसे यांना 3 मते मिळाली. उपसरपंचपदासाठी सोनम सुदामभसे यांना 4  तर योगिता शरद भसे यांना 3 मते मिळाली.

मतदानाचे वेळी संदीप चव्हाण, रेश्मा मराठे, वसंत दौनेसह सातही सदस्य उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी म्हणून आर. टी. खरात यांनी काम पाहिले. ग्रामसेवक एल. सी. चव्हाण यांनी सहकार्य केले.
कार्यकर्त्यांनी भंडार उधळून व पेढे वाटून तसेच फटाके वाजवून विजयाचा आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.