Maval : टाकवे गावात विनामास्क व डबल सिट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

Punitive action against unmasked and double seat people in Takve village

एमपीसी न्यूज – आंदर मावळची प्रमुख बाजारपेठ असलेल्या टाकवे गावात अद्याप तरी सुदैवाने कोरोनाचा रुग्ण सापडला नसला तरी खबरदारी म्हणून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता पोलीसप्रशासन, ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने विनामास्क तसेच मोटारसायकलवर डबल सिट फिरणाऱ्यां दहा जणांवर काल  दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

टाकवे ही आंदर मावळ परीसरातील पंच्चेचाळीस गावांची मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने याठिकाणी नागरिकांची खरेदी तसेच अन्य तत्सम कारणांसाठी मोठी वर्दळ असते.

यावेळी अनेक नागरिकांकडून मास्क वापरले जात नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंग नियमाचे  पालन केले जात नसल्याचे दिसून आले आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, बाहेर पडल्यास मास्क वापरणे तसेच मोटारसायकल वरुन डबल सिट फिरु नये  फिरताना आढळणाऱ्या नागरिकांवर ५०० रुपये दंड वसूल केला जाणार असल्याचे ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.