Maval : भरधाव कार ओढ्यात कोसळली; नेरे दत्तवाडी येथील डॉक्टरचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील चांदखेड येथे ओढ्यात ( Maval) रविवारी (दि. 19) मध्यरात्री एक भरधाव कार कोसळली. यामध्ये कारमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

डॉ. सत्यजित अर्जुनराव नवाडे (वय 42) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, डॉ. सत्यजित नवाडे यांचे नेरे दत्तवाडी येथे माऊली हॉस्पिटल आहे. ते रविवारी मध्यरात्री चांदखेड येथून कारने (एमएच 14/जेएक्स 1547) जात होते. चांदखेड येथील ओढ्यात त्यांची कार कोसळली. स्थानिक नागरिकांनी याबाबत राणी रुग्णवाहिकेचे अजय मुऱ्हे यांना माहिती दिली. त्यांनतर मुऱ्हे यांनी शिरगाव पोलीस आणि रुपेश गराडे यांना माहिती दिली.

Alandi : युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी घेतले माऊलींच्या समाधीचे दर्शन

त्यानुसार वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आपदा मित्र मावळ संस्थेचे निलेश गराडे, अजय मुऱ्हे, अनिश गराडे, कुष्णा गायकवाड, प्रतीक थोरवे, शुभम काकडे, विनय सावंत, विकी दौंडकर, गणेश ढोरे, शिरगाव पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

ट्रॅक्टरच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये डॉ. सत्यजित नवाडे अडकले होते. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

डॉ. सत्यजित नवाडे हे मावळचे माजी तहसीलदार दत्तात्रय ठोंबरे यांचे मेहुणे होते. ठोंबरे हे सध्या सोलापूर येथे उपजिल्हाधिकारी पदी नेमणुकीस ( Maval) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.