Maval/Shirur: पहिल्याच दिवशी मावळसाठी 14 तर, शिरुरसाठी 18 इच्छुकांनी नेले उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना आज (मंगळवारी )जारी झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज वाटप करणे आणि स्वीकरण्यास सुरुवात केली आहे. आज पहिल्याचदिवशी मावळ लोकसभा मतदारासंघासाठी 14 इच्छुकांनी अर्ज नेल्याचे जनता संपर्क अधिकारी गौरी पवार यांनी सांगितले. तर,  शिरुरसाठी 18  इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी सांगितले. 
मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना निगडी, येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक विभागाच्या कार्यालयातून अर्ज दिले जात आहेत. तर, शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयातून उमेदवारी अर्ज दिले जात आहेत.
  • सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दिले जात आहेत. आज पहिल्याच दिवशी मावळ लोकसभा मतदारासंघासाठी 14 तर शिरुरसाठी 18  इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर, दोन्ही मतदारसंघात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. शनिवारी आणि रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्जाचे वाटप केले जाणार नाही.
मावळ आणि शिरुर मतदारसंघामधून निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना 9 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. प्राप्त अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी होणार आहे. तर, 12 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. 29 एप्रिलला या दोन मतदारसंघासाठी प्रत्यक्षात मतदान पार पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.