BNR-HDR-TOP-Mobile

Maval/ Shirur: पॉलिटिकल संडे ! उमेदवारांचा भेटी-गाठीवर भर

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग येऊ लागला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत मतदारराजा घरी भेटण्याचा हक्काचा दिवस म्हणजेच सुट्टीचा रविवार …आज सुट्टीच्या रविवारचे निमित्त साधून महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांनी भेटी-गाठी, कोपरा सभा आणि  प्रचारफे-यांद्वारे मतदारांशी संपर्क साधला. 
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज रविवारचा मुहुर्त साधत पिंपरी-चिंचवड शहरात भेटी-गाठीवर भर दिला. काळेवाडी येथील महात्मा उद्यानात मॉर्निंग वॉक केला. यावेळी वासुदेवांनी कवने गाऊन अनोख्या प्रचाराला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त पिंपरीतील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर थेरगाव येथील बुद्धविहाराला भेट दिली. सु्ट्टीचे निमित्त साधत काळेवाडी, थेरगाव, नखाते वस्ती, रहाटणी, थेरगाव परिसरातील मोठ्या सोसायट्यांना भेटी दिल्या. घरी जाऊन मतदारांच्या वैयक्तिक भेटी-गाठी घेतल्या.
  • मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी देहूरोड, वडगाव, मावळ परिसरात प्रचार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीतील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नागरिकांच्या भेटी-गाठीवर घेण्यावर भर दिला.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट) गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज भोसरी मतदारसंघात प्रचार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. भोसरी, मोशी परिसरात कोपरा सभा, बैठका घेतल्या. आजी-माजी नगरसेवकांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. त्यांच्यासमवेत चर्चा केली.
  • तर, शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांनी आंबेगावात प्रचार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आढळराव यांनी मतदारांशी संवाद साधला. भेटी-गाठी घेतल्या.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.