maval : मावळ लोकसभेसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी द्या; मांडलेल्या ठरावाला कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठींबा

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी हातवर करुन ठराव मांडला. तसेच अनुमोदन मावळ तालुका ग्रामीण अध्यक्ष मा.सुभाष जाधव यांनी दिले.

सर्व प्रमुख कार्यकत्यांनी ठरावाला हात वर करुन पाठींबा दिला. तसेच हा ठराव लोकनेते माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाठवला.

यावेळी महाराष्ट्र ओ.बी.सी.सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबोधे, मावळ निरीक्षक मा.विजयराव कोलते, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहे बभेगडे, अर्चना घारे, हेमलता काळोखे, किशोर भेगडे, संतोष भेगडे, सचिन घोटकुले, संतोष मु-हे, राजश्री राऊत, सुनिल दाभाडे, बाबुराव वायकर, सुनिल भोंगाडे, कैलास गायकवाड,जिवन गायकवाड,अशोक घारे, दिपक मानकर, अंकुश आंबेकर,नारायण ठाकर,नवनाथ चोपडे,अशिष खांडगे,संजय शेडगे,अतुल राऊत आदी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.