Maval : उद्धव ठाकरे यांची मावळ मध्ये उद्या सभा

एमपीसी न्यूज : –  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे उद्या मावळ (Maval)लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर येत आहेत . त्यांनी मावळ मतदार संघात जनसंवाद दौरा आयोजित केला आहे.

पक्ष फुटल्या नंतर पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला गेलं. त्यानंतर येणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे अनेक ठिकाणी दौरा करताना दिसत आहेत.

 

Pimpri : चालू वर्षात महापालिकेची विक्रमी पाणी पट्टी वसुली

उद्धव ठाकरे मावळ लोकसभा मतदारसंघात  पनवेल, खोपोली,उरण या तीन ठिकाणी उद्या सभा घेणार आहे. दुपारी तीन वाजता  हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे उद्घाटन उद्धव ठाकरे करणार असून , दुपारी चार वाजता पनवेल येथे जनसंवाद सभा घेणार आहेत.
त्यानंतर साडेपाच वाजता खोपोली तिथे सतीश झाकोटिया मैदान इथे सभा घेतली जाणार आहे.संध्याकाळी साडेसात वाजता नवीन सेवा मैदान, उरण या ठिकाणी सभा होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.

 

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून आलेले माजी महापौर संजोग वाघेरे त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. यामुळे आता राज्यात अनेक ठिकाणी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share