Maval : पवना धरणातील विसर्गामध्ये कपात ; 2 हजार 208 क्युसेक इतका विसर्ग सुरु

एमपीसी न्यूज- मागील दोन दिवसापासून पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसामुळे पवना धरणातुन अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु केला होता. मात्र पावसाचा जोर ओसरल्यामुळे पाण्याच्या विसर्गामध्ये कपात करण्यात आली असून आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून 2 हजार 208 क्युसेक इतका विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

मावळसह पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात काल,बुधवारपर्यंत जोरदार पाऊस सुरु होता. त्यामुळे पवना धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत होती. पवना धरणामधून बुधवारी (दि.4) सकाळी 6 वाजता 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येऊन सकाळी सव्वा अकरा वाजल्यापासून 12 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता.

मात्र आज, या विसर्गामध्ये कपात करण्यात आली असून आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून 2 हजार 208 क्युसेक इतका विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

दरम्यान, मागील 24 तासात पवना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 41 मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या मोसमामध्ये 3378 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवसापर्यंत 3183 मिमी पावसाची नोंद झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.