Maval : शिवभक्त दिनेश ठोंबरे यांच्या बहिणीचा शिववंदनेने संपन्न झाला विवाह सोहळा

एमपीसी न्यूज – पारंपरिक विवाहाला बगल देत शिववंदना ग्रुप, मावळचे अध्यक्ष दिनेश ठोंबरे यांनी आपल्या बहिणीचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांची शिववंदना घेऊन पार पाडला. समाजात एक आगळावेगळा उपक्रम राबवत नवविवाहितांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन नवीन आयुष्याला सुरूवात केली.

दिनेश ठोंबरे यांनी आपली बहीण मोनिका हिचा विवाह सनी यांच्या बरोबर लावून देताना छत्रपती शिवाजी महाराजांची शिववंदना घेऊन मावळ तालुक्यांमध्ये विवाहाचा नवीन पायंडा पाडला.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार सुनील शेळके, नगरसेवक किशोर भेगडे, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, मुळशी तालुका उपसभापती शंकर मंडेकर, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, अनिकेत घुले टायगर ग्रुप अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.