Pune : महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धा सोमवारपासून

एमपीसी न्यूज –  स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशन व पुणे महानगरपालिकेतर्फे पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील ९ संघातून १६० खेळाडू स्पर्धेसाठी पुण्यामध्ये दाखल झाले असून आज  स्पर्धेची पूर्वतयारी व सराव करण्यात आला. दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमी, कात्रज आंबेगाव येथे दि.१९  फेब्रुवारी २०२० पर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे.

स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशन व पुणे महानगरपालिकेतर्फे पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. राज्यभरातील ९ संघातून १६० खेळाडू स्पर्धेसाठी पुण्यामध्ये दाखल झाले असून आज (दि. १६)  पूर्वतयारी व सराव करण्यात आला. विविध भागांतील स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत वयोगटाप्रमाणे पाच गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. अश्वारोहणातील ड्रसाज, शो-जंपिंग, टेंट पेगिंग आणि जिमखाना इव्हेंटस् अशा चार प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

सोमवार (दि. १७) रोजी या स्पर्धेचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून (दि.१९) फेब्रुवारी २०२० पर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे. विजेत्या संघाला पुणे महापौर चषक प्रदान करण्यात येणार आहे, तर ड्रसाज, शो-जंपिंग, टेंट पेगिंग प्रकारात विजेत्यांना रोख १ लाख रुपयांची पारितोषिके या निम्मिताने देण्यात येणार आहेत. राज्यातील विविध भागांतून स्पर्धक येणार असल्याने अश्वारोहणातील कौशल्य पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.