Mhalunge Crime News : महिलेकडे लग्नाची मागणी करणाऱ्या विवाहित पुरूषाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करणा-या महिलेला विवाहित पुरूषाने वारंवार लग्नाची मागणी केली तसेच, कंपनीत छ-यांची एअर गन घेऊन महिला व कामगारांना शिवीगाळ केली. याप्रकरणी विवाहित पुरूषाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संबधित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केशव बालाजी चापलपल्ले (रा. दत्तकृपा हौसिंग सोसायटी घरकुल, चिखली) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा विवाहित असून फिर्यादी महिलेच्या ओळखीचा आहे. आरोपीने फिर्यादी महिलेला लग्नाची मागणी घातली. मात्र, महिलेने लग्नास नकार दिला. तरीही आरोपीने महिलेचा वारंवार पाठलाग केला व वारंवार लग्नाची मागणी केली.

तसेच महिलेच्या कंपनीत छ-यांची एअर गन घेऊन जात महिला व कामगारांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नवले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.