Vadgaon Maval : आमदार सुनील शेळके यांचा भर पावसात विकासकामांचा पाहणी दौरा; 45 कोटींहून अधिक रुपयांच्या कामांचे केले लोकार्पण

एमपीसी न्यूज – वडगाव शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. भर पावसात वडगाव (Vadgaon Maval) शहरातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाके वाजवून उत्स्फूर्तपणे स्वागत केले. वडगाव नगरपंचायत हद्दीत 45 कोटी रुपयांहून अधिक रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व पाहणी दौरा यावेळी करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, मा सभापती बाबुराव आप्पा वायकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोर, सभापती गणेश आप्पा ढोरे, तज्ञ संचालक सुभाषराव जाधव, दिपकभाऊ हुलावळे, मा उपसरपंच तुकाराम ढोरे, मंगेशकाका ढोरे, सुनिल चव्हाण, मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र ढोरे, उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, नगरसेवक राजेंद्र कुडे, रा. काॅ.वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, सुरेश कुडे, सुनिल ढोरे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, मंगेश खैरे, नगरसेविका पूनम जाधव, माया चव्हाण, पूजा वहिले, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, विष्णू ढोरे, रा. काॅ.प्रभारी अतुल राऊत, प्रविण ढोरे, अतुल वायकर, विशाल वहिले, गणेश जाधव, शरद ढोरे, संदिप ढोरे आणि वडगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी, मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका, पत्रकार बांधव, जैन समाज बांधव तसेच शहरातील विविध सोसायटीतील हितचिंतक मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मुलभुत सुविधांची कामे पुर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या पाहणी दौऱ्यात साखळी रस्ता, एकविरा कॉलनी रस्ता, मिलिंद नगर चौक रस्ता, वडगाव सांगवी रस्ता, मुख्य बाजारपेठेतील रस्ता इ. पाहणी करण्यात आली. तर एमआयडीसी रोड ते तळेगाव हद्द रस्ता, मोरया चौक ते शिवाजी चौक रस्ता, सिद्धिविनायक चौक ते गणपती मंदिर येथील रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच ‘आपलं वडगाव’ या सुशोभीकरण करण्यात आलेल्या चौकाचे व नगरपंचायत कार्यालय येथे अग्निशमन दल गाडी, घंटागाडी, ट्रॅक्टर, अशा लोकोपयोगी वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच मुख्य बाजारपेठेतील रस्ता काॅक्रिटीकरणचे काम पूर्ण होत आल्याने शहरातील जैन बांधव संघटनेच्या वतीने आमदार सुनिल आण्णा शेळके यांचा सत्कार करण्यात आला.
“गावाचे गावपण टिकवून गावचा सर्वांगीण विकास कसा केला पाहिजे, लोकप्रतिनिधींना साथ कशी दिली पाहिजे, हा वडगावचा आदर्श इतरांनी देखील घेतला पाहिजे. वडगावची जनता सुज्ञ आहे. वडगाव शहरात आम्ही जर कामे केली नसतील तर आमच्या उमेदवारांना मतं देऊ नका आणि जर विकास कामे केली असतील तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,” असे आवाहन आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी वडगावकरांना केले.
मावळ (Vadgaon Maval ) तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरातील नगरपंचायत नव्याने स्थापन होऊन पाच वर्षे पूर्ण होत आहे. शहराच्या वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करुन नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधींनी केला असून शहरातील मुख्य रस्त्यासह, अंतर्गत रस्ते, पाणी, आरोग्य, पथदिवे, बंदिस्त गटार अशा मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत ती कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे. केवळ आश्वासने न देता सर्वसमावेशक व शाश्वत विकास करण्यावर नेहमीच भर दिला आहे.

याशिवाय आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या खंबीर साथीने त्यांच्या प्रयत्नांतून संपूर्ण वडगाव कातवीसाठी ४० कोटी रुपयांच्या वाढीव पाणी योजनेचा पाठपुरावा शासन दरबारी सुरू असून येणा-या काही महिन्यांतच या फिल्टर पाणी पुरवठा योजनेला मान्यता मिळून सर्वांना स्वच्छ पाणी मिळेल. तसेच “घर तिथे रस्ता” या संकल्पनेतून प्रत्येक घरापर्यंत पक्का रस्ता बनवण्याचा आमचा मानस असणार आहे अशी अपेक्षा नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांनी व्यक्त केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.