Alandi : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे आळंदीतील 5 शाळांमध्ये वॉटर प्युरिफायरची सुविधा

एमपीसी न्यूज – वीलो कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांचे सहकार्याने शालेय मुलां- मुलींसाठी सामाजिक बांधिलकीतून विकसित करण्यात आलेल्या शुद्ध पिण्याचे पाण्याच्या वॉटर प्युरिफायर 9 युनिट यंत्रणेचे लोकार्पण रोटरी क्लब ऑफ आकुर्डी अध्यक्षा कल्याणी कुलकर्णी यांचे हस्ते उत्साहात करण्यात आले. आळंदी पंचक्रोशीतील 5 शाळांत 9 युनिट विकसित करून सुमारे 3 हजार मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार असल्याने परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Vadgaon Maval : आमदार सुनील शेळके यांचा भर पावसात विकासकामांचा पाहणी दौरा; 45 कोटींहून अधिक रुपयांच्या कामांचे केले लोकार्पण

या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ आकुर्डी अध्यक्षा कल्याणी कुलकर्णी, सर्व्हिस  प्रोजेक्ट डायरेक्टर रोटरी क्लब ऑफ आकुर्डी गौतम शहा, रो. मेंबर राजेंद्र तुपे, रो. मेंबर विनीत कुलकर्णी, आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, शाळेचे मुख्याध्यापक संतोष मरभळ,विजया आवटे, अक्षता कुलकर्णी, अंकुश बहिरट, सत्यवान लोखंडे, मुख्याध्यापक साहेब पवळे, गोपाळ उंबरकर , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळ आळंदी (Alandi)  नगरपरिषद शाळा क्रमांक एक, शाळा क्रमांक दोन, महंत गणेशानंद पुणेकर महाराज संचलित निराधार बालक आश्रम आणि शाळा, ध्यास फाऊंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धनी बालक मंदिर या चार शाळांत प्रत्येकी दोन युनिट आणि मदर तेरेसा आश्रम शाळा निवासी मुलींचे वसतिगृह येथे एक युनिट असे नऊ युनिट वॉटर प्युरिफायर यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आल्याचे अध्यक्षा कल्याणी कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी सर्व शाळांत उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शैक्षणिक अडीअडचणी , भौतिक सेवासुविधा देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ आकुर्डी नेहमी सर्वांत पुढे असतो. या बद्दल रोटरीचे कार्याचे कौतुक करण्यात आले. आळंदी (Alandi) जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी शाळांची निकड लक्षांत घेऊन सातत्याने पाठपुरावा करीत उपक्रम राबविल्या बद्दल त्यांचा सर्व शाळांचे वतीने सत्कार करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.