MLC Election: भाजपच्या उमा खापरे यांनी विधान परिषदेसाठी दाखल केला अर्ज

एमपीसी न्यूज – विधान परिषद (MLC Election) निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून  प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष उमा खापरे यांनी आज (गुरुवारी) विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदर रणजितसिंह निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले व  महिला मोर्चाच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

Pimpri Corona Update: शहरात गुरुवारी 47 नवीन रुग्णांची नोंद, 15 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

कोण आहेत उमा खापरे?

उमा खापरे (MLC Election) या पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन वेळा भाजपाच्या नगरसेविका होत्या. 2001-02  मध्ये त्या महाहापालिकेत विरोधीपक्ष नेत्या होत्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

प्रदेश भाजपा कार्यकारणीत गेली 20 वर्षे त्या विविध पदांवर कार्यरत आहेत. सध्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. बुधवारी विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे नाव चर्चेत आले.

त्यांनी आज   विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या निवडून आल्यास शहराला चौथा आणि शहर भाजपला तीसरा आमदार मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.