PDFA League : कमांडोजच्या मोठ्या विजयात महेकची हॅटट्रिक

एमपीसी न्यूज – कमांडोज संघाने गुरुवारी (PDFA League) येथे पीडीएफए महिला लीगमध्ये केशव माधव प्रतिष्ठानवर 6-0 असा दणदणीत विजय मिळवत आपली आगेकूच कायम राखली. यामध्ये महेक शेख हिने आपली छाप पाडताना शानदार हॅटट्रिक साधली.

Pimpri Corona Update: शहरात गुरुवारी 47 नवीन रुग्णांची नोंद, 15 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

अ गटाच्या एकतर्फी सामन्यात, महेकने 15व्या, 21व्या, 59व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी केली. सामन्यात  कविता यादव (23वे), कांचन शर्मा (34वे), हर्षदा शर्मा (45वे) यांनी अन्य गोल केले.

उत्कर्ष (PDFA League) क्रीडा मंचने त्यांच्या ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी आपापल्या लढती जिंकून आजचा दिवस साजरा केला. ब गटात विविका दयाल (11वे) हिने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर उत्कर्ष क्रीडा मंच अ संघाने एफसी  बेकडिन्होचा 1-0 असा पराभव केला.

उत्कर्षच्याच (PDFA League) ब संघाने अरणा सिंधव (13वे) आणि अनिका टोपले (56वे) यो दोघींनी  केलेल्या गोलच्या जोरावर सासवड एफसी चा 2-0 ने पराभव केला.

निकाल

एसएसपीएमएस मैदान  महिला लीग

गट ब : उत्कर्ष क्रीडा मंच ‘अ’: 1 (विविका दयाल 11वे) वि.वि. एफसी बेकडिन्हो: 0

गट अ : उत्कर्ष क्रीडा मंच ‘ब’: 2 (अरणा सिंधव 13वे; अनिका टोपले 56वे) वि.वि.  सासवड एफसी  0

गट अ : कमांडोज: 6 (महेक शेख 15वे, 21वे, 59वे, कविता यादव 23वे, कांचन शर्मा 34वे,हर्षदा शर्मा 45वे,) वि.वि. केशव महादव प्रतिष्ठान  0

गट अ –  सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्स: 3 (पियुषा नरके 4थे, 51वे,; अभिलाषा मेहरा 41वे,) वि.वि. दिएगो ज्युनियर्स: 1 (यशिका तेजवानी)

एसएसपीएमएस मैदान द्वितीय विभाग, सुपर-8

डेक्कन इलेव्हन ‘सी’: ० बरोबरी वि. डायनामाईट्ससह  ०

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.