Pimpri News : चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी मनसेचे महापालिकेत आंदोलन

एमपीसी न्यूज – “पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना फसवू नका, फसवू नका”, “पाणी द्या, पाणी द्या, 24 तास पाणी द्या”, “प्रशासनाचे करायचे काय, खाली डोके वर पाय” अशा जोरदार घोषणा देत मनसेने महापालिका मुख्यालय दणाणून सोडले. 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मनसेने आज (मंगळवारी) आंदोलन केले.

मनसेचे गटनेते, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहरसचिव रुपेश पटेकर, महिला अध्यक्ष अश्विनी बांगर, सीमा बेलापुरकर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, श्रद्धा देशमुख, रुपेश पटेकर
बाळा दानवले, मयुर चिंचवडे, अश्विनी ताई बांगर, स्नेहल ताई बांगर, राजु सावळे, विशाल मानकरी, सुशांत साळवी, सुरेश संकट, निलेश कांबळे, संजय मोरे, सचिन सोनटक्के, अशोक धोत्रे, नारायन पठारे, विजया परदेशी, नितीन चव्हाण, सुजाता काटे, रवी जाधव, दत्ता देवतरासे या आंदोलनासाठी उपस्थित होते.

तसेच, मयुर हजारे, आण्णा कापसे, सुरेश भिसे, काशिनाथ खजुरकर, कृष्षा बिरुणगिकर, सागर शिंदे, साईराम भोसले, के के कांबळे, आनंद भाकरे, रमेश उकाडे, आशिष चव्हाण, रोहण कांबळे, निलेश नेटके, विद्याताई कुलकर्णी, रणजित ठाकुर, सीमातीई बेलापुरकर, श्रद्धा देशमुख, सगिता देशमुख, सचिन मिरपगार, नितिन सुर्यवंशी, अनिताताई पांचाळ, वैशालीताई बौत्रे, आकाश सागरे, रवी कोणरकर आदी मनसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. त्यावेळी शहरवासीयांना केवळ सहा महिने हा त्रास असेल, त्यांनतर नियमित पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आज जवळपास दोन वर्षांपासून ‘दिवसाआड’ पाणी पुरवठ्याची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर बसलेली आहे.

नोव्हेंबर 2021 पासून दररोज पाणीपुरवठा केला जाईल असे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले होते. पण, नोव्हेंबर महिना अर्धा संपत आला. तरी, पाणीपुरवठा दररोज सुरू केला जात नाही. पवना धरणात मुबलक पाणीसाठा असून 24 तास पाणीपुरवठा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.