Chinchwad : पार्क केलेल्या कारमधून मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – कारमध्ये ठेवलेला मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 6) रात्री नऊच्या सुमारास चिंचवड येथील अहिंसा चौकात घडला.

निलकंठ शिवदार तागतोडे (वय 51, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तागतोडे यांनी त्यांची कार अहिंसा चौक, चिंचवड येथील कामिनी हॉटेलसमोर पार्क केली होती. दरम्यान, चोरट्यांनी उघड्या काचेतून सुरवेंद्रसिंग बाला यांच्या नावे असलेला 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.