Gaja Marne : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेसह 14 जणांवर पुन्हा मोक्का

एमपीसी न्यूज : कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marne) आणि त्याच्या 14 साथीदारांवर पुन्हा मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. शेअर टेडिंगमध्ये गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात व्यावसायिकाचे अपहरण करून 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता गजा मारणे याच्यासह 14 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात मंगळवारी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वयेची (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे, रुपेश कृष्णराव मारणे, सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप, हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील, अमर शिवाजी किर्दत,  फिरोज महंमद शेख, मोनिका अशोक पवार, अजय गोळे, नितीन पगारे, प्रसाद खंडागळे, नवघणे अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. यातील चार जणांना अटक करण्यात आली असून गजानन मारणे याच्यासह इतर आरोपी फरार आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गजानन मारणे आणि त्याच्या टोळीने पुण्यातील एका तरुण व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणी कारवाई करत चार जणांना अटक केली होती.

गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी (Gaja Marne) संघटितपणे गुन्हेगारी करत स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्या संदर्भातला प्रस्ताव तयार करून अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित प्रस्तावाची पडताळणी करून गजानन मारणे आणि त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.