Pashan news: सैनिक कुटुंबीयास संरक्षण देण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पुणे ग्रामीणच्या पोलीस मुख्यालयात संपन्न

एमपीसी न्यूज: भारतीय सैन्यात कार्यरत असणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याबाबत जिल्हास्तरीय समिती बैठक डॉक्टर अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी, 11 ऑक्टोबर रोजी चौथी त्रैमासिक बैठक भीमाशंकर हॉल, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे पार पडली.
या बैठकीस नलावडे पोलीस उप  अधिक्षक गृह (पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण) समितीचे प्रभारी अध्यक्ष दीपक शेळके, जिल्हा सैनिक कल्याण संघटक व श्री शेंडे, साहेब जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हे उपस्थित होते.

या बैठकीत मागील बैठकीतील एकूण 14 समस्यांचा आढावा घेतला गेला. या बैठकीमध्ये पुणे ग्रामीण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक जिल्हास्तरीय प्रतिनिधी यांना ओळखपत्र देण्यात आले. वरिष्ठ माजी सैनिक पंढरीनाथ भामे व इतर माजी सैनिक यांनी विविध विभाग संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी अध्यक्षांसमोर 13 अर्ज सादर केले.
यापैकी पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या व प्रवेशाकरिता समस्यांचे निराकरण करणे कामी सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. माजी सैनिक हनुमंत निंबाळकर यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.