Wakad : वाकड परिसरातील विकी मल टोळीवर मोक्का

एमपीसी न्यूज – वाकड परिसरातील (Wakad) सराईत गुन्हेगार विकी मल याच्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळीवर गंभीर स्वरूपाचे 15 गुन्हे दाखल आहेत.

टोळी प्रमुख विकी रामप्रसाद मल (वय 42, रा. कैलासनगर, थेरगाव), प्रसाद रोहीदास भापकर (वय 24, रा. मोहन नखाते चाळ, शिवशक्ती कॉलनी, रहाटणी), प्रतीक अंतवण पवार (रा. थेरगाव) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींच्या विरोधात वाकड, पिंपरी पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत, दुखापत, पळवून नेणे, डांबून ठेवणे, खंडणी मागणे, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, वाहनांची तोडफोड करणे, तसेच वाहनांची जाळपोळ करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा करणे असे 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या टोळीमधील सर्व आरोपी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात नको का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, (Wakad) पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ दोन) काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर (गुन्हे-1), सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे (वाकड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड सहायक फौजदार सुहास पाटोळे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, शिमॉन चांदेकर यांच्या पथकाने केली आहे.

Chinchwad : ‘साठवणीतल्या आठवणी’ मधुर मुरांब्यासारख्या – गिरीश प्रभुणे

पिंपरी चिंचवड पोलिसांनी मागील आठ महिन्यांच्या कालावधीत 30 गुन्हेगारी डोळ्यांमधील एकूण 248 आरोपींवर नको का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.