Chinchwad : नोकरीचे अमिष दाखवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तरुणीचा विनयभंग करण्याचा विनयभंग केला. ही घटना चिंचवड मधील चाफेकर चौकात दुपारी पाचच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार धनंजय निवृत्ती शिंदे (रा. काळेवाडी पेट्रोल पंपासमोर, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय पैसे घेऊन खाजगी क्षेत्रात नोकरी देण्याचे काम करतो. त्याने फिर्यादी तरुणीला एका नामांकित खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. तरुणीने फी बाबत विचारले असता त्याने तिच्याशी अश्लील भाषेत बोलून तसेच तिच्याशी अतिप्रसंग करून तिचा विनयभंग केला. यावरून तरुणीने तात्काळ चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेखा सागर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.