Pimpri : आरोपीला लवकरात लवकर शोधा

महिला अत्याचार समिती व महिला वुमन हेल्प लाईनची मागणी

एमपीसी न्यूज –  भाजपच्या एका पदाधिका-याने भाजपच्याच एका पदाधिकारी महिलेला अश्लिल व्हिडिओ पाठवून विनयभंग केला. पोलिसांनी संबंधित आरोपीला लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी महिला वुमन हेल्प लाईन व महिला अत्याचार विरोधी समितीच्या नीता परदेशी यांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन महिला अत्याचार विरोधी समितीच्या नीता परदेशी, अनिता सोनवणे,  शैलजा गुरव, सलिमा पठाण, मेघा गायकवाड, राणी जाधव आदी महिला उपस्थित होत्या.

मागील काही दिवसांपासून आरोपी पीडित पदाधिकारी महिलेला त्रास देत होता. तसेच त्याने अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग केला. यावरुन त्रासलेल्या महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणा-या पदाधिकारी महिलेला अशा प्रकारच्या त्रासाला सामोर जाव लागणे ही बाब गंभीर आहे. त्यापेक्षा गंभीर बाब ही की, संबंधित महिला ज्या राजकीय पक्षात काम करते त्याच पक्षातील एका पुरुष पदाधिका-यांकडून तिचा विनयभंग करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.