Chikhali : महिलेचा पाठलाग करत तिचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करत तिचा विनयभंग (Chikhali ) कऱणाऱ्या रोडरोमियोवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.28) सकाळी तळवडे येथे घडली.

Pune : ‘त्या’ दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणखी एकाला रत्नागिरीत अटक

याप्रकरणी पिडीतेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मारूती भोईनवाड (रा.तळवडे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांची तोंड ओळख आहे. फिर्यादी पायी जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला, तसेच रस्त्यात हात धरून माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत प्रेमाचा प्रस्ताव ठेवला.

मात्र सार्वजनीक रस्त्यावर असा हात पकडल्याने फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली. यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा (Chikhali ) दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.