Pune : ‘त्या’ दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणखी एकाला रत्नागिरीत अटक

एमपीसी न्यूज – रात्रगस्तीदरम्यान( Pune) पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांसंदर्भात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आता दहशतवाद विरोधी पथकाने रत्नागिरी येथून आणखी एकाला अटक केली आहे. त्याने पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी मदत केली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. तर फरार झालेल्या दहशतवाद्याला त्याने आर्थिक मदतही केली होती.

PCMC : क्रीडा विभागाची जबाबदारी उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांच्याकडे

कोथरूड पोलिसांनी 18 जुलै च्या रात्री कोथरूड परिसरातून मोहम्मद इमरान मोहम्मद युसुफ खान (वय 23) आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (वय 24) या दोघांना अटक केली होती. तर त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.

या दहशतवाद्यांना पुण्यात आल्यानंतर आश्रय देण्यासाठी मदत करणाऱ्या आणखी एकाला दहशतवाद विरोधी पथकाने ( Pune) आधीच अटक केली आहे. त्यानंतर आता रत्नागिरी येथूनही आणखी एका आरोपीला अटक केली आहे.

या दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी सहाय्य करणाऱ्या रत्नागिरी येथील आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने त्याला रत्नागिरीहून चौकशीसाठी बोलावले होते.

त्यानंतर त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने 28 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आणखी एका संशयिताला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस ( Pune) बजावली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.