Maharshtra : येत्या 48 तासात मान्सून तळ कोकणात धडकण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – संथ गतीने का असेना पण मान्सून आगेकूच करत असून तो येत्या 48 तासात कर्नाटक, गोवा, तमीळनाडू, महाराष्ट्र या राज्यांच्या काही भागात दाखल होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Dighi : ‘सीएमई’ हद्दीतील सांडपाणी प्रकल्पाला संरक्षण विभागाचा ‘हिरवा कंदील’

पुढील 24 तासांत पूर्वोत्तर राज्यांमध्ये तसेच उत्तर-पूर्व राज्यांच्या उर्वरित भागांवर आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांवर पुढील 48 तासांत नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी ही परिस्थिती अनुकूल होत आहे.तसेच महाराष्ट्र (Maharshtra), गोवा, कर्नाटक, तमीळनाडू या राज्याच्या काही भागात मान्सून येण्याची स्थिती निर्माण झाल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे.

दुसऱ्या बाजूला बिपरजॉयचा ही धोका –

तर दुसऱ्या बाजूला ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ अधिकाधिक प्रभावी होताना दिसून येत आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या 36 तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला असून पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकणार असल्याची ही माहिती आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी अरबी समुद्रात न जाण्याचा असा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे.

त्यामुळे वेळेत मान्सून येणार की शक्यता आणखी ताणली जाणार हे पुढच्या दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.