Morwadi News: प्रभाग क्रमांक दहा मधील विविध विकास कामांचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन – अनुराधा गोरखे

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 10 संभाजीनगर शाहूनगर, मोरवाडी यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये विकास कामांचा उच्चांक गाठला असून या सर्व विकास कामांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते रविवारी सायंकाळी पाच वाजता उद्घाटन होणार आहे ,अशी माहिती शहर सुधारणा समितीच्या सभापती व स्थानिक नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रभागामध्ये भाजपचे तीन नगरसेवक आहेत. माझ्यासह तुषार हिंगे व केशव घोळवे  या सर्वांच्या सहकार्य व समन्वयाच्या माध्यमातून ही विकास कामे झाल्याची माहिती त्यांनी दिली. रविवारी बर्ड व्हॅली मधील फाउंटन शो, केएसबी चौक येथील कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांचे स्मारक, शिव शाहू शंभो उद्यान, संभाजीनगर विरंगुळा केंद्र, मोरवाडी म्हाडा राजश्री शाहू उद्यान शाहूनगर, त्याचबरोबर चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद व क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्मारक सुशोभीकरण अशी अनेक कामे प्रभागात झाली आहेत. या सर्व कामांचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडणार आहेत.

प्रभागात रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे, 24 बाय 7 पाणी पुरवठा व इतर सुविधाही गेल्या पाच वर्षात पार पडल्या. याच बरोबर मोरवाडी येथे दिव्यांगांसाठी प्रशिक्षण केंद्र तसेच केएसबी चौक येथे शाहू सृष्टी, संभाजी नगर बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय, मोरवाडी ऑटो क्लस्टर येथील सायन्स पार्क अशी अनेक प्रभावी कामे गेल्या 5 वर्षात मार्गी लावली आहेत. याचबरोबर दत्तनगर, विद्यानगर, लालटोपीनगर या परिसरातही कमान उभारणे, इंटरनल रोड, सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे व सार्वजनिक स्वच्छतागृहे यासारखी कामे आम्हाला मार्गी लावता आल्याचे नगरसेविका गोरखे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.