Moshi Crime : गौण खनिजे चोरून नेणा-या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मोशी येथील खाणीतून गौण खनिजे चोरून नेणा-या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 1) सकाळी आठ वाजता करण्यात आली.

अविनाश किसन जाधव (वय 22, रा. मोशी), रवी हिरण्णा राठोड (वय 37, रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जयश्री महेश कवडे (वय 43, रा. दापोडी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैधरीत्या गौण खनिजांची वाहतूक करणा-यांवर कारवाई करण्याचे अपर तहसीलदारांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार तहसील कार्यालयातील एक पथक मोशी परिसरात गस्त घालत होते.

मोशी येथील खाणीतून दोन ट्रॅक्टर 80 हजारांचे दगड (डबर) चोरून घेऊन जाताना या पथकाच्या निदर्शनास आले. फिर्यादी कवडे यांच्या पथकाने दोन्ही ट्रॅक्टरवर कारवाई करत ट्रॅक्टर चालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.