Moshi crime News : हॉटेल चालकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत फोनवर बोलत जात असलेल्या हॉटेल चालकाचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 23 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली आहे.

तुषार पोपट घिगे (वय 24, रा. हवालदार वस्ती, मोशी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 8) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल चालक आहेत. ते 23 सप्टेंबर रोजी हवालदार वस्ती, मोशी येथून रस्त्याने पायी मोबाईल फोनवर बोलत जात होते.

त्यावेळी आळंदीच्या दिशेने एका दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातातील 29 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला आणि भारत माता चौकाच्या दिशेने पोबारा केला.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.