Moshi Crime : गंधर्वनगरी येथे एक लाख 37 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप तोडून घरातून एक लाख 37 हजारांचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. घरफोडीची ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी सहा वाजता मोशी येथील गंधर्वनगरी येथे उघडकीस आली.

हेमंत शंकर भोर (वय 35, रा. गंधर्वनगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोर यांचे घर शुक्रवारी (दि. 25) रात्री ते शनिवारी (दि. 26) सकाळी सहा या कालावधीत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातून 41 ग्रामचे सोन्याचे मंगळसूत्र, 18 ग्रामचे सोन्याचे नेकलेस, 2 ग्राम कानातील टॉप आणि दोन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख 37 हजारांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.