Moshi : फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज- फ्लॅट विक्री करण्याच्या बहाण्याने चार जणांनी एका ज्येष्ठ नागरिकांची 21 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मोशी येथे घडली.

जवाहरलाल पन्नालाल जैन (वय 65, रा. होळकर चौक, सातारा) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष विठ्ठल कर्नावट, अमृतलाल कांजी निसर, किरीट मावजी पटेल, मुकेश पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी जैन यांना मोशी येथील कृष्णकमल या बांधकाम साईटमध्ये फ्लॅट देण्याचे कबूल केले. त्यासाठी आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून जैन यांच्याकडून एकूण 20 लाख 60 हजार 300 रुपये धनादेश द्वारे तसेच ऑनलाईनही हस्तांतरित करून घेतले. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी जैन यांना खरेदीखत न करून देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.