Sanvi : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज- लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार करत तिचा छळ करण्यात आला. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुभाष उर्फ नागेश आनंदा नरवाडे, सुमित्रा आनंदा नरवाडे, जयवंता पुंडा नरवाडे (सर्व रा. पिंपळे गुरव), ज्ञानेश्वर यशवंता मोकमपल्ले (रा. कंधारेवाडी, नांदेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष याने फिर्यादी तरुणीला लग्नाचे अमिष दाखवले. तिला घरी नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपी सुभाष याची आई सुमित्रा हिने तरुणीला हाताने मारहाण केली. तसेच, सुभाषचा मेहुणा आरोपी ज्ञानेश्वर याने तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.