Moshi : बँक खात्यात पैसे शिल्लक नसताना धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
एमपीसी न्यूज – बँक खात्यात पैसे शिल्लक नसलेला धनादेश देत एकाची तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मोशी येथे घडली.
अभिमान भानुदास जोगदंड (वय 45, रा. चऱ्होली फाटा, आळंदी रोड, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. अक्षय दत्तात्रय जगताप (वय 24, रा. आदर्श कॉलनी, किवळे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे 2019 या कालावधीत आरोपी जोगदंड याने फिर्यादी जगताप यांच्याकडून फ्लॅय ऍश बॅगच्या खरेदीपोटी रोख रक्कम घेतली. तसेच टी. टी. घोलप नावाचे बनावट शिक्के व सह्या असलेले इव्हाईस व चलन तयार केले.
तसेच खात्यात शिल्लक नसलेल्या बॅंक खात्याचा साडेसात लाख रुपयांचा धनादेश देऊन जगताप यांची फसवणूक केली. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. पांचाळ करीत आहेत.