Moshi : राहत्या घरातून महिला बेपत्ता

एमपीसी न्यूज – राहत्या घरातून महिला बेपत्ता झाली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संतनगर भोसरी येथे घडली.

श्रीदेवी जगन्नाथ मिरगे (वय 28, रा. संतनगर, साईप्रभू बिल्डिंग, भोसरी) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जगन्नाथ रामण्णा मिरगे (वय 36) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिसात माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता श्रीदेवी आणि जगन्नाथ हे पती पत्नी आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीदेवी कोणास काही न सांगता निघून गेल्या. श्रीदेवी यांचा रंग सावळा, उंची पाच फूट, नाक सरळ, केस काळे, नेसणीस काळ्या रंगाचा सलवार कुर्ता आहे. त्यांच्याजवळ मोबाईल फोन, मंगळसूत्र आणि कानातले आहे. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून त्या हिंदी व कन्नड भाषा बोलतात. वरील वर्णनाच्या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.