Moshi workshop : कवितेसाठी मन संवेदनशिल आणि निरीक्षण करणारे असावे -कवी वादळकार

एमपीसी न्यूज : कविता सुचण्यासाठी आपले निरीक्षण पाहीजे. (Moshi workshop) तसेच आपले मन संवेदनशिल असले पाहीजे. मनाची विशालता असेल तर अनेक विषयांना स्पर्श करणारे लेखन करता येते, असे मत प्रा.राजेंद्र सोनवणे ऊर्फ कवी वादळकार यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी वर्गात कवितेची आवड निर्माण व्हावी.त्यांच्याकडून काव्यलेखन निर्माण होण्यासाठी कविता कशी सुचते आणि कवितेचे लेखन कसे करावे यासाठी विद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली.(Moshi workshop) त्यावेळी ते बोलत होते, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवी वादळकार हे उपस्थित होते तर गायञी स्कुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भोंगाळे,सचिव संजय भोंगाळे,व्यवस्थापकीय संचालिका कविता पाटील,विश्वस्त सरिता विखेपाटील,कवयिञी दिव्या भोसले आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना कवी वादळकार म्हणाले की,”कविता लेखन करताना साधे साधे लिहीले पाहीजे. मराठी भाषेतील काव्यगुणांचा,नऊ रसांचा,अलंकाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे.(Moshi workshop) अनेक कवींच्या कवितांचे वाचन केले पाहीजे. भविष्यातील चांगले कवी विद्यालयात निर्माण होतील.अशी भावना विद्यार्थी वर्गाबद्दल व्यक्त केली.भावनांना आपल्या शब्दात मांडता येणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.

Chakan accident : भरधाव बसने दुचाकीस्वार महिलेस चिरडले

स्वामी विवेकानंद व सरस्वतीचे पूजन करून आणि दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी विद्यालयात त्यासाठी स्वामीविवेकानंद काव्यमंच ची स्थापना करण्यात आली.(Moshi workshop) कविता लेखनासाठी विद्यालयाने केलेला प्रयत्न कौतुकास पात्र आहे.गायञी इंग्लिश मिडीयम स्कुल,गंधर्वनगरी,मोशी येथे सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक यांनी काव्यरचना सादर केल्या.तसेच कवी वादळकार यांच्या बहारदार काव्य सादरीकरण केले. या कार्यशाळेचे नियोजन श्रध्दा गुरव, भारती पाटील,शशिकांत जोडवे यांनी केले.स्वाती निकम यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन अशोक बुर्डे यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.