Pune Crime News : तब्बल 37 वार करून मावस भावाचा खून, पुण्यातील घटनेने खळबळ

एमपीसी न्यूज – बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येचा एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने आपल्याच मावस भावाचा धारदार कात्रीच्या सहाय्याने तब्बल 37 वार करून निर्घृण (Pune Crime News) खून केलाय. बारामती तालुक्यातील रुई येथील साईनगरमध्ये सोमवारी ही घटना घडली. गजानन अनंतराव पवार (वय 37) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मृत गजानन पवार यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर त्याला वडील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. हे पाहून त्याने रडण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर परिसरातील लोक एकत्र जमा झाले. उपस्थित काही लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर बारामती तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहिती नंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी संतोष जगन्नाथ गुळगुळे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी खून केल्यानंतर मूळ गावी म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी जाण्याच्या तयारीत रेल्वे स्टेशनला गेल्याची माहिती पोलिसांना (Pune Crime News) मिळाली.त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले.
https://youtu.be/hvRM8m5HfYI

आरोपी आणि मृत व्यक्ती हे सख्खे मावस भाऊ आहेत. दोघांचा एकत्र केश कर्तनालायाचा व्यवसाय होता. मात्र दोघांचेही सतत भांडण व्हायचे.या भांडणातूनच गजानन पवार याचा खून करण्यात आल्याचे त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.