Pune : मुस्लिम मूक महामोर्चात खासदार संजय काकडे सहभागी

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे - संजय काकडे

एमपीसी न्यूज – मुस्लिम समाजात आर्थिकदृष्ट्या गरीब व मागास कुटुंबांची संख्या लक्षणीय आहे. या समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणायचे असेल तर, त्यांना आरक्षण दिलेच पाहिजे, अशी मागणी राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी केली.

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज पुण्यात काढण्यात आलेल्या मुस्लिम मूक महामोर्चात खासदार संजय काकडे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भात आपली भूमिका मांडली. खासदार संजय काकडे आपल्या कार्यकर्त्यांसह मुस्लिम आरक्षणाच्या समर्थनार्थ टी-शर्ट घालून मूक महामोर्चात सहभागी झाले होते.

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गोळीबार मैदान ते कौन्सिल हॉल मूक महामोर्चा काढण्यात आला. यामध्ये खासदार काकडे आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते.

काय आहेत मुस्लीम समाजाच्या मागण्या ?

1) मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे

2) मॉबलिचिंगच्या घटना थांबल्या पाहिजे

3) मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डातील हस्तक्षेप थांबला पाहिजे

4) वक्फ बोर्ड जमिनीवरील अतिक्रमण हटवा

5) मुस्लिमांना अट्रोसिटी कायद्याअंतर्गत सुरक्षा द्या

6)  दलित , मुस्लिमांवरील आत्याचाराच्या घटना थांबवाव्यात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.