Pimpri : एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक 

एमपीसी न्यूज – एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो म्हणून पालकांना सात लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. हा फसवणुकीचा प्रकार हिंजवडी येथील सुरतवाला प्लाझा येथून 12 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट दरम्यान झाला आहे.

मोहनलाल इंदराज सिंग (वय 52, रा. कुलाबा, मुंबई) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नित्या ठाकूर, सहकारी श्रीवास्तव राजेश्‍वर सिंग, अरविंद भागीरथप्रसाद कुमार (रा. दुनदुरिया अरमाई, झारखंड) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा मिहीर याला एचपी-एमबीबीएसओके या लिंकवरुन आपण एमबीबीएसच्या प्रवेशासाठी एजन्सी चालवत असल्याची बतावणी करण्यात आली. त्यानुसार विचारणा केली असता मिहीरला सोलापूर येथील अश्‍विनी मेडीकल कॉलेज येथे प्रवेश मिळवून देऊ असे सांगून विश्‍वास संपादन केला. पहिल्या वर्षीची फी ही पूर्णपणे रोख भरावयाची असल्याचे सांगितले. यावेळी मोहनलाल सिंग यांच्याकडून सात लाख रुपये रोख घेतले. मात्र प्रवेश मिळाला नाही. अशीच फसवणूक आणखी देघांचीही झाल्याचीही तक्रार मोहनलाल यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.