MPC News Online Ganeshotsav : सहभागी व्हा ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाइन गणेशोत्सवात, जिंका आकर्षक पारितोषिके

एमपीसी न्यूज : सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. बाप्पाला घरी आणण्यासाठी सर्वांची लगबग सुरु आहे.(MPC News Online Ganeshotsav) आकर्षक सजावट करण्याकरिता खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांत पहिले ‘एमपीसी न्यूज‘ पोर्टल यावर्षीही ‘ऑनलाइन गणेशोत्सव‘ ही संकल्पना राबवत आहे. आपल्या घरचा, गृहनिर्माण सोसायटीचा गणपती ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याची त्याचबरोबर अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची अनोखी संधी मिळणार आहे.

घराघरांत आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव‘. प्रत्येक घरी विशिष्ट विषयांवर आधारित आकर्षक सजावट केली जाते. बाप्पापुढे केल्या जाणा-या सजावटीमधून समाजात चांगला विचार पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. (MPC News Online Ganeshotsav) याच प्रयत्नांना ‘एमपीसी न्यूज‘ बळ देणार आहे. प्रत्येकाच्या घरातील बाप्पा ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून संपूर्ण जगभर दाखवले जाणार आहेत.

Crime News : दहिहंडी कार्यक्रमा दरम्यान टोळक्याकडून तरुणाला मारहाण

आपल्या घरातील, गृहनिर्माण सोसायटीतील अथवा आपल्या कार्यालयातील बाप्पांचा, गणेशोत्सवातील सजावटीचा फोटो, आपले नाव आणि पत्यासह mpcnews.in या आमच्या प्रसिद्ध मराठी वेब पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्याचबरोबर या उपक्रमात सहभागी होणाऱ्या निवडक स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत. बाप्पांचे फोटो [email protected][email protected] या मेलवर पाठवावेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.