Crime News : दहिहंडी कार्यक्रमा दरम्यान टोळक्याकडून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – दहिहंडीचा कार्यक्रम बघायला गेलेल्या तरुणाला मद्यपी टोळक्याने मारहाण केली आहे.हा प्रकार रहाटणी येथे शनिवारी (दि.20) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडला.

याप्रकरणी दिपक दशरथ बनसोडे (वय 23 रा. रहाटणी) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून बंटी कांबळे, दिपक दाखले, रोहित नायगम, ऋषिकेश माने, निखील येवले व एक महिला सर्व राहणार नखाते वस्ती, रहाटणी असा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे दहिहंडीचा कार्यक्रम बघण्यासाठी आले होते. यावेळी मदयपी आरोपींनी नशेत गर्दीमध्ये फिर्यादीला धक्काबुक्की केली.यावेळी फिर्यादी यांनी त्यांना हटकले असता आरोपींनी आरडा-ओरड करत भांडण्यास सुरुवात केली.यावेळी फिर्यादी यांचे मित्र आतिश कांबळे हे भांडणे सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी चिडून फिर्यादीला पकडून ठेऊन डोक्यात दगड मारून जखमी केले.यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.