Mulshi : मुळशी धरणातून 15 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज- मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळशी धरण जवळपास 100 टक्के भरले असून धरणातून 15 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे धरणाच्या खालील भागातील मुळा नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पातळीमध्ये वाढ होत असून शुक्रवारी संध्याकाळपासून 9 हजार 600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यानंतर पावसाचा आढावा घेऊन रात्री दहा वाजता पाण्याचा विसर्ग 9 हजार 600 वरून 12 हजार 513 क्यूसेक्स करण्यात आला.

त्यानंतर मध्यरात्री पाण्याचा विसर्ग 12 हजार 513 क्युसेक्स वरून 15 हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे धरणाच्या खालील भागातील मुळा नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्या त्याचप्रमाणे सांगवी भागातील नदीकाठच्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन टाटा पाॅवर व महसूल प्रशासन मुळशी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.